गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

मध्यरात्रीच्या वेळी...

मध्यरात्रीच्या वेळी अचानक
सख्यास जाग आली...
पाहिले सखिला तेव्हा सखी
झोपेतच, हसताना दिसली...
निरखून पाहता जाणवले...
कोण्या स्वप्नात गुंग होती...
तसाच होता तिला न्याहाळत तो...
जेव्हा जाग सखीसही आली...
पाहिले तिने सख्यास जेव्हा..
पुन्हा लाजुनी डोळे मिटुनी...
सखी मग, मिठीत सख्याच्या शिरली...

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

निर्णय

चुकीच्या म्हटलेल्या गोष्टी
नेहमीच चुकीच्या असतात?
योग्य म्हटलेल्या गोष्टी
कधीच का चुकीच्या नसतात?

परिस्थितीच्या गरजेनुसार
प्रत्येकजण वागत असतो
त्या क्षणी, त्या परिस्थितीत
प्रत्येकजण बरोबर असतो..

मग मागाहून त्या गोष्टी
चुकीच्या म्हणण्यात काय अर्थ?
असंच जर म्हणायचं असेल
तर सारं जीवनच होईल व्यर्थ

म्हणूनच घेतलेल्या निर्णयावर
ठाम राहता यायला हवं..
पुढं येणार्‍या प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देता यायला हवं

नाहीतर जगाच्या संगण्यानुसार
आपण प्रत्येक गोष्ट करतो
आयुष्याच्या शेवतो मात्र
आपणच मूर्ख ठरतो...

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

कसूर

हम कहते गये जो ना कहना था…
वो हर लब्जपे हमारें बस रोते गये..
कसूर तो हमारा ही था..
जो ना देखा उनकी आँखों में..
बस खुद के जख्म दिखातें रहे..
हक़िक़त तो ये थी की
पुरा दिल कुरेडा था हमने..
पर उन्होने उफ्फ भी ना किया…
और हम और घाव बनातें गये..
जब पता चला के हम ही गलत थे…
देखा सनम का हाल…
उसके बाद से जिंदगी के आखरी साँस तक..
बस खुद ही से आंखें चुराते रहे..

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०

तुझ्यासाठीच केवळ...

सखे.. तुझ्यासाठी मेळवेन
मी अवकाश धुलीला.
तुझ्यासाठी नमवेन
मी या सार्‍या जगाला..
सांगशील तू तर सूर्यास विझवेन...
तुझी उशी बनवण्या चंद्रासही आणेन...
तुझ्या हाकेवर केवळ मी
उभा जन्म वाहीन...
तुझ्यासाठीच केवळ...
पुन्हा पुन्हा जन्म घेईन...

ओढ कशाची असे मनाला...

सामोरी येता तू सखे
हरवतो डोळ्यात तुझ्या...
नसशी समोर जेव्हा तू..
आठवतो नजरेस तुझ्या...
सांग मला मग कधी बोलावे...
काय माझ्या मनात असे अन्..
कसे सांगावे सखे तुला...
नित्याचेच झाले हरवणे..
आठवणे.. केवळ तुला...
सांग सखे मी राहू कसा..
जर दिसली नाहीस तू... कधी मला...
मला ना ठावे काय असे हे..
का हे घडावे, माझ्यासवे...
ओढ कशाची असे मनाला...
प्रेम का जडले.. तुझ्यासवे?

शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

कोई इतना इश्क़ हमसे करता..
तो हम जान भी लूटा देते..
कोई प्यार से माँग लेता
तो पूरा जहाँ नज़र करते...
वो ना जाने क्यूँ दिल में लिए बैठे हैं
के हम उन्हे भूल जाएँगे...
और हम पता नही कब से
उन्ही के नाम की साँसे ले रहे हैं...

उन्हे जाने क्यूँ लगता हैं
के हम बेवफा हैं
और हम हैं के उनकी खातिर
खुदा से भी बेवफ़ाई कर लेते हैं

त्या दोघांची... चंदेरी भेट

पावसाळा नुकताच संपलेला...
संध्याकाळची वेळ....
नदीचा तीर... खळखलणारे पाणी..
आकाशी चाललेला रंगांचा खेळ...

पश्चिमेने उधळलेल्या रंगछटा
अश्याच काहीश्या सखीच्या केशलता...
तिचे मावळतीच्या खेळात मग्न होणे...
त्याचे मात्र तिच्याकडे पहाणे...

मधूनच एखादी वार्याची झुळुक..
अंगावर आणते शहारा हळूच..
कातरवेळी त्याचा तिला स्पर्श..
शृंगाराचीच जणू देई चुणूक...

मावळतीला अंधार दाटत जातो...
पूर्वेहून मग चंद्रकला उगवते..
त्या दोघांची भेट तेव्हा पूर्ण होते...
जेव्हा... चंद्राने रात्र चंदेरी होते...