बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

तू.. अन् तुझी निखळ मैत्री..

रोज भेटायचो आम्ही.. अगदी आवर्जून
गर्दी असेल भेटायच्या जागी..
तर हाक मारायचो एकमेकांना... हात उंचावून..

भेटलो की बोलायचो.. माझ्याबद्दल, तिच्याबद्दल..
आणि खूप सार्‍या विषयांबद्दल...
रंगायच्या आमच्या गप्पा.. भरपूर..
भाणही नसायचे.. वेलेबद्दल..

इतक्या गर्दितही गप्पा मारताना..
आम्ही कोणाच्या मद्ध्यात नसायचो..
आणि कोणी त्रास देऊ गेला..
की त्याला अद्दल घडवायला मागे नसायचो..

अशीच आमची मैत्री होती,
अगदी झार्याप्रमाणे निखळ..
एकमेकांबद्दल विचारही होते.
पाण्याप्रमाणे नितळ.

पण एकदिवस ती म्हणाली..
"मला तुझ्याशी बोलायचे नाही..."
का? म्हणून विचारले तर..
"मला तुला ते सांगायचे नाही.."

खोडून विचारल्यावर कळले..
ती माझ्यात गुंतली होती..
मला थोडा धक्काच बसला.. कारण..
ही गोष्ट माझ्या मनातही नव्हती..

थोडा विचार केल्यावर वाटले..
मलाही ती आवडते..
एखाद्या दिवशी नाही भेटलो तर..
माझे ही खूपकही आडते..

पण असा विचार कराण्याइतके..
नशीब साथीला नव्हतेच कधी..
कारण माने जरी जूळली तरी..
'जोड्या' तर जुळल्या होत्याच आधी...

मग मात्र म्हटले तिला मी -
"ती आहे... नको तू बोलूस...
पण... विसरुही नकोस, कोणी मित्र आहे तुझा..
हाक दे केव्हाही.. जेव्हा मदत लागेल तुला.."

माझ्याही मनात राहशील तू..
अन् तुझी निखळ मैत्री.. तशीच..
वेगळे होऊनही एकटत्रच असु..
विसरणार नाही मी तुला.. कधीच..

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

शब्द असती जणू तारे ते आकाशीचे..
जोडून पाहता होते नक्षत्र कधी त्यांचे..
एकटे पाहता वाटे...
कोण असतील मित्र यांचे?
________________
पाहण्याचा ढंग आपुला
ठरवून जातो... चित्र नभाचे..
कधी दिसे ते एकट्याचे..
कधी कधी नक्षत्र ते चांदण्यांचे...

कविता करताना जेव्हा शब्द सुचत नाहीत तिला... 
करिता मी त्यावर कविता एखादी...
म्हणते माझे सारे शब्दही साथ तुला देती..
मज एकटी करून जाती..
का असे ते वागती मजपाशी
प्रयत्न करते मी किती..
त्यांना सजवन्याचे, फुलवण्याचे   ..
सोबत त्यांच्या कोण्या एका स्वप्नांच्या गावी जाण्याचे..
तरीही का रे जमत नाही मज..
तुझ्या सारखी कविता..
सांगतो तिला मग
सखे, शब्द केवळ आहेत माझे..
भाव मात्र नेहमी तुझे मग..
का बोल राग तुझा कश्याकरिता?

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

बस पलभरभी याद ना रहा..
उनको हमारे साथ जो बिताया था..
तो प्यार क्या याद रहेगा उन्हे..
जो हमने उनसे जताया था..

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

ओर्कुटवर झालेली मैत्री
कधी वाढत गेली,
कळलेच नाही त्या दोघांना..
मैत्रीचे प्रेम कधी झाले
समजलेच नाही त्यांना..
प्रेमात पडले होते खरे दोघे..
भेटले मात्र नव्हते कधीच...
आयुष्यभराच्या आणा-भाका मात्र
झाल्या होत्या आधीच...
कधी स्क्रॅप, कधी ईमेल
कधी कॉल करून बोलणे..
एकमेकांना चिडवणे..
एकमेकांसाठी झूरणे...
ऑनलाइन भेट नाही झाली
तर रुसणे तर कधी भाण्डणे..
मग आला दिवस प्रेमाचा...
ठरला बेत भेटिचा..
जागा ठरली... वेळ ठरली..
दोघे अगदी आतुरतेने भेटले...
इतके दिवस प्रेमात असूनही..
आज खरे मिलन झाले..
इतके सारे होऊनसूद्धा
काहीतरी वेगळे होते..
भेटीत दोघांच्या गप्पा सोडून
बाकी सारे जमले होते..
एकमेकांना समोर पाहून
आनंद गगनात मावत नव्हता...
पण... नेमके काय बोलावे
याला विषयच मिळत नव्हता..
एकमेकांची चौकशी झाली
पुढे काहीच होत नव्हते..
एकमेकांना पाहून हसण्याखेरीज...
दोघांना काहीच जमत नव्हते...
दुसर्या दिवशी पुन्हा
दोघे ऑनलाइन भेटले...
एकमेकांची माफी मागून
पुन्हा गप्पांमध्ये गुंतले..
---------------------------------
थोडक्यात काय...
माने आलियेत जवळ...
साधने झालीयेत अफाट...
सभाषणाला मिळालाय वेगसुद्धा सुसाट..
पण इतके सारे होऊनही...
एक मात्र कमी आहे..
प्रत्यक्षात भेटनार्‍या माणसातले...
अंतर मात्र वाढत आहे...

उद्देश... माझा.. जीवनाचा..

उद्देश... माझा.. जीवनाचा..
असा विचार केल्याला खूप काळ लोटलाय.
पण जेव्हा जेव्हा विचार केला..
तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळा निष्कर्ष निघाला..
कधी वाटले आपल्याला देवाने पाठवलाय.. मस्तपणे हुन्दडायला...
कधी वाटले.. छे मी तर आलोय इथे काही साध्य करायला..
काहीतरी खास.. जसे देवाने पाठवले अर्जुनाला..
त्या शिवरायला.. त्या शंभुराजाला...
त्या शाहूला.. फुले आंबेडकरांना..
पण कधी कधी मी विचार करतो..
नक्की काय बरे हवे असेल देवाला..
माझ्याकडून? खरेच कोणी सांगेल मला?
माझे धेय काय? कोणी दाखवेल का वाट ??
पण मग.. अचानक वाटते..
कोण कशाला देवच सांगेल.. कसे?
त्याला जे हवे आहे ते समोर आनेल आणि काहीतरी इशारा करेल..
बस्स.. तो इशारा समजायला हवा..
बाकी सगळे होईलच.. आपोआप...

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

विचार... चौकटीच्या बाहेरचा..

कधी केलाय विचार?
चौकटीच्या बाहेरचा..
कधी पहिलाय अंधार?
नजरेच्या पलीकडचा...

कसा कोणास ठाऊक..
पण मला तो अंधार दिसला..
आणि पडला प्रश्न..
या सुवर्ण काळाच्या जगात तो काळा कोपरा .. कसला??

नीट पहिले तेव्हा दिसले..
जाणवले..
ही तर वेगळीच दुनिया..
आपल्याच दुनियेतली..
आपली भूक वरवर्चीच..
इथली भूक 'आतली'

आपल्या जगातून येणार्‍या
दयेच्या किरणांवर हे जगतात..
ज्या ते ही नाही मिळत..
ते त्या अंधारातच मरतात...

काही ना काही घडल्यावर..

वार्याची एक झुळुक..
घामाने थबथबल्यावर..
पारावरची सावळी..
उन्हात फिरून आल्यावर..
थंडगार पाण्याचा एक घोट..
खूप घसा सुकल्यावर..
परिजातकाचा सडा...
ती अचानक दिसल्यावर..

अश्या सगळ्याच छोट्या गोष्टी..
मोठ्या होतात..
काही ना काही घडल्यावर..
अशयाच छोट्या गोष्टी शेवटी
मोठा आनंद देऊन जातात..
इतका की विशाहूनही कडू आठवणी
क्षणात विरून जातात..

कंटाळा येतो ना..

कंटाळा येतो ना.. मला..
तेव्हा मी कविता लिहितो...
चार.. ओळींची.. नाही म्हणजे तसे मी ठरवतो..
की लिहुयात काहीतरी लांबलचक.. वेळ जाईल निघून..
मग मी लिहु लागल्यावर हलू हलू माझा उत्साह संपत संपत कविता ही संपते..
आणि मग ती राहते.. फक्त चार.. ओळींची नव्हे..
शब्दांची..
मग उगीच तिला शेपटी लावतमी तिला लांब करत नेण्याचा प्रयत्न करतो..
हनुमानाच्या शेपटीएवढी कविता लिहीण्याचा संकल्प..
त्याच शेपटी ला कापड गुंडालणार्‍यांच्या उठशाहासारखा कमी होतो..
आणि मी अर्ध्यातच शेपटी पेटवून देतो..
काय?
शेपटी पेटवतो? कोण?
मी.. कविता सम्पवतो..
आणि मग मला कळते.. की शेपूट कुठली..
वेळ जावा म्हणून नकळतच मी थंडीत.. (म्हणजे ए सी च्या)
शेकोटी मिळावी म्हणून कविताच पेटवून दिलेली असते..
त्या कागदाची राख गोळा करायची ही इच्छा नसते..
मग मी त्या राखेवरच दुसरी कविता लिहीत लिहीत..
कधीतरी झोपी जातो..

कविता मी आणतो..

कविता मी आणतो.. त्या गावाहून..
जिथे सापडतो स्वप्नसडा... रोज रातीला..
भेटतो जिथे रवि.. किरणांना...
अन् चंद्र चांदन्यांना..

भेटती जिथे भाव मनीचे सारे...
जणू आकाशातील तारे..
नसे जिथे कल्पनेस बंध..
दर वळतो जिथे रातरानी सुगंध..

परतत असता भेटती शब्द
म्हणती येतो सोबतीला...
जाती देऊन जाता जाता..
अर्थ माझ्या कवितेला..

चंद्र गेला तरी कुठे?

एके रात्री ती सोबत असताना..
वाटले... तिला डोर कुठे न्यावे..
मस्त चांदण्यात फिरवून आणावे..
दाखवावा चंद्र नि म्हणावे..
"प्रिये, पहा... तो चंद्रसुद्धा तुझ्यासाठीच झुरतो जणू...
त्याचे झुरनेच हे सारी रात्र
चंदेरी करून जातेय..."
पण, चंद्र काही दिसत नव्हता...
चांदणे तर अगदी लख्ख...
मग, चंद्र गेला तरी कुठे?

चंद्राची वाट पहात
हळूहळू पहात झाली.. उजाडू लागले...
झोप मोडली नि समोर चंद्र दिसला...
विचारले त्याला..
"काय रे होतास कुठे?"
तो म्हटला... "अरे.. असं काय करतोस..?
तुझ्याच सोबत तर होतो रात्रभर..
अगदी तुझ्या शेजारी...
तुझ्या सखीच्या चेहर्यावरचे तेज बनून... "

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

आणि पुन्हा कामाला लागतो..

कधी चांदण्या पहिल्यात....
आकाशभर पसरलेल्या..
काही लुकलुकतात.. काही हालतात..
काही फेर धरून नाचू लागतात
आणि नक्षत्र होऊन बसतात..
काही आकाशातुन खालीही पडतात..
अश्या शांदण्या पाहता पाहता
कधीतरी हळूच झोप लागते..
त्यातलीच एखादी चांदणी मग
स्वप्नविश्वात घेऊन जाते..
अगदी अनोळखी, अनोलख्या
अश्या काही ठिकाणांची सैर करवते...
म्हणे आपलेच काही लोक देवाघरि जाउन चांदणी होऊन बसतात..
त्यातली काही मंडळींची भेट ही एक चांदणी घडवून देते..
आणि मग रंगतात गप्पा...
'दूरच्या' आपल्यांशी...
अगदी खूप खूप आठवणी,
गप्पा आणि गाणी..
काही वेळाने डोळ्यासमोर एक पडता येऊ लागतो..
अंधाराचा.. छे उजेडाचा..
कारण तोवर सकाळ झालेली असते..
आणि सुर्यनारायण आपला किरणांचा रथ घेऊन
दिवसाच्या सफरीवर निघालेला असतो..
बस्स.. मग आपण त्या चांदणी सोबतच्या सहलीची मजा घेऊन
ताजे होऊन पुन्हा दिवसाची सुरूवात करतो..
कोणीतरी म्हणते आज काहीतरी खास वाटतं..
आपण उगीचच हसतो.. आणि पुन्हा कामाला लागतो..

जगावं ... कुणासारखं?

कधी वाटतं जगावं... पक्ष्यांसारखं
पंख पसरून फिरावं स्वछन्दि
राज्य करावं आकाशावर
कुठंही विचरण्यास नसावी बंदी

कधी वाटतं जगावं... माश्यासारखं
खोल खोल पोहत जावं
सागराच्या तळाशी राहावं
आणखी खोल जाताना, अडवणारं कोणी नसावं

कधी वाटतं जगावं... चंद्रासारख
रोज रात्री यावं
कधी मोठं व्हावं, कधी गायब व्हावं
कवींच्या कल्पनेत सतत रहावं

कधी वाटतं जगावं... सूर्यासारखं
सार्‍या जगास प्रकाश द्यावा
दिसामाजी आराम करावा
रोज सार्यांचा नमस्कार घ्यावा

कधी वाटतं जगावं... राजासारखं
आपल्याच धुंदीत राहून
प्रजेला ताब्यात ठेवून
वाटेल तसं राज्य करून
सार्‍या जीवनाचा घ्यावा आनंद

कधी वाटतं जगावं... योग्यासारखं
काही नसून असल्यासारखं
सारं असून नसल्यासारखन
भिकारी असूनही... राजासारखं

शेवटी वाटतं जगावं... आपल्याचसारखं
शरीर इथे.. अं मन कुठे
आपण आले राहून सुद्धा
जाउ शकतो पाहिजे तिथे..

संकल्प...

आत्तापर्यंत वागलो तसं...
पुन्हा कधीही वागायचं नाही..
आत्तापर्यंत जगलो तसं...
पुढचं आयुष्य जगायचं नाही..

फक्त पुढेच चालत जायचं..
मागे वळून पाहायचं नाही...
नव्या शिखरांवर आरूढ व्हायचं
एकाच ठिकाणी रमायचं नाही..

नवी स्वप्ने नवा ध्यास...
रोज गाठायचं नवं आकाश..
उंच हवेतला मोकळा श्वास
धरतीकडे पाहताना ठिपक्याचा भास..

इतकं उंच उडत असताना
एक मात्र विसरायचं नाही...
कितीही यश मिळालं तरी..
माणूसपण सोडायचं नाही...

स्वप्न ... मनातल्या साठवणींचे....

असाच एकांती बसलो होतो..
थोडासा विचार करत...
कसला?? ठाऊक नाही...
पण विचार करत होतो खरा...
आणि अचानक एक वार्याची झुळुक आली..
झुलुकेसोबत सुगंध आला..
भिजल्या मातीचा.. मंद सुगंध...
आणि डोळ्यासमोरचे दृष्य बघता बघता पालटले..
अचानक ढग भरून आले..
अचानक नभ काळे झाले..
त्यातून वीजा कडाडू लागल्या...
अन् पाण्याच्या धारा कोसलल्या..
अश्या.. जणू सारी धरतीच त्यांनी व्यापून टाकिली..
आणि तितक्यात अचानक कुठून तरी एक मोठी नदी वाहत आली..
अगदी माझ्या जवळ... जवळ..
आणि मी ही वाहू लागलो त्या जलधारांमध्ये..
अगदी दूर दूर जाउन पोहोचलो.. समुद्रापर्यंत..
आणि अचानक कोणी हाक मारीली.. काय रे.. असा एकटाच का बसलायेस??
तेव्हा आलो भानावर.. आणि समजले...
तो पाउस.. ती नदी.. तो समुद्र.. सारे सारे विश्व.. आठवणींचे होते..
ते सारे स्वप्न माझ्या मनातल्या साठवणींचे होते..

आयुष्यात माझ्या परत ये...

एक सांगू?
तू जरी नाही बोललिस ना...
तरी डोळे मात्र बोलतात तुझे..
ओठी तुझ्या काहीही असलं..
तरी मनात मात्र विचार माझे..

कळतंच नाहीए मला..
तू अशी का वागतियेस..
काहीच कारण नसताना..
स्वतःलाच का त्रास देतियेस?

सारी दुनिया झूठ असेल..
तुझं प्रेम झूठ नाही..
माझ्याशिवाय तुझ्या मनात..
कोणी असणं शक्यच नाही..

मनातली गोष्ट करायला
दुनियेची भीती हवीच कशाला?
दुनियेलाच जर गरज नसेल..
तर आपल्याला त्यांची गरज कशाला?

पुन्हा पुन्हा विनवतोय मी
आयुष्यात माझ्या परत ये...
पूर्वीचं सारं विसरून जा..
आणि माझ्या कवेत ये...

(एक जुनी कविता... ती त्याला सोडून गेलेली असताना त्याने तिची केलेली विनवणी.. )

मी.... केवळ.. निमित्तमात्र...

शब्दांना व्यक्त व्हायचं असतं...
कुठंतरी... कुणाच्या तरी निमित्ताने...
मग ते निघतात...
अश्याच कोण्या निमित्ताच्या शोधात..
खूप शोध घेतात सारे मिळून..
आणि खूप विचारही करतात...
व्यक्त होण्याआधी...
कारण, व्यक्त होताना
जर त्यांच्या मनीचा खरा अर्थ...
व्यक्त करणार्‍यालाच समजला नाही.. तर?
म्हणून मग आधी ते
एक सफर करून येतात..
आणि मग कोण्या एकाला निवडतात...
निमित्त म्हणून...
असेच काहीसे शब्द मला शोधत येतात...
मग अगदी त्यांना हवे तसे व्यक्त होतात..
कवितेतून... चारोळीतून...
किंवा आणखी वेगळ्या रूपातून...
तेव्हा... जादू आहे ती या शब्दांची...
मी.... केवळ.. निमित्तमात्र...
सुर्या उगवला.. पश्चिमेला..
नि ध्रुवाने सोडीली जागा.
आली ती जन्मानन्तर भेटीला..
जणू सापडला स्वर्गसुखाचा धागा...

अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..

सुरुवातीला होते अडचण..
शब्दरचना करताना...
खूप कष्ट घ्यावे लागतात
शब्दांचे यमक जुळवताना...

कधी कधी जमते सारे..
कधी फजितिही होते...
अश्याच काहीश्या प्रयत्नांनी..
मग कविता लिहीणे जमू लागते..

शब्दांनाही जाणवते मग
आपल्या मनी भाव आहे...
कधी आज कधी उद्या..
तर कधी.. आठवणींचा गाव आहे..

शब्दच मग येऊ लागतात
सदैव आपल्या मदतीला...
पाहता पाहता सजवून जातात
आपल्या मनीच्या कवितेला...

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...

आली निवडणूक पुन्ह्यांदा...
आणखी एक सुट्टी मिळणार हाय...
माझ्या लेकरा-बाळाला घेऊन
मी सहलीला जाणार हाय...

उभ्या असलेल्या उमेदवारांमधी..
कोणीच निवडायच्या लायकीचा न्हाय
आणि म्हणूनच मला यावेळी बी..
मतदानाला जायचं न्हाय...

असाच विचार करून
निम्म मतदानबी होणार न्हाय
अन्.. शंभरातल्या ७० ला नको असूनबी...
एक उमेदवार निवडून येणार हाय...

एक एक मत विकत घ्यायला
त्यानं बक्कळ पैसा खर्च केलेला हाय..
आणि म्हणूनच तो बिनपैशाची
कोणाचीच कामं करणार न्हाय...

म्हणून सांगतो मंडळी..
मतदान करणं गरजेचं हाय..
कारण, सगळ्यांनी प्रयत्न केल्याबिगर...
"INDIA"चा भारत होणार न्हाय...

हे.. असेच चालायचे..

शब्दाला शब्द जोडायचा...
अन् एखादी सुंदर कविता करायची..
माझ्या मनात काही असायचे..
समोरच्यानं मात्र भलतीच समजायची...

मी म्हणायचं...
'ती आली... भेटली...
अन् माझ्या मिठीत शिरली.. '
माझा विचार इथेच थांबायचा...
ऐकनार्‍याचा मात्र..
नेमका इथेच सुरू व्हायचा...

म्हणूनच वाटते कधी
कविता करायलाच नको..
मी काही लिहायला नको
आणि कोणी काही समजायला नको..

पण तेवढ्यात 'तिने' म्हणायचं...
"कर ना एखादी छानशी कविता..."
अन् मी पुन्हा सुरू व्हायचे ...
लिहायला लागायचे...
हे.. असेच चालायचे...

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१०

पण... राया आधी...

काल बाजारी नजर भिडवूनि
केला तुम्ही मला इशारा
मनात भरता वचन दिले मी..
देईन तुम्हा मी ताबा सारा...
आज पौर्णिमा वचनपुर्तीची
घ्या तुमचा लवाजमा
पण... राया आधी... दार जरा लावून घ्या...


विसरूनी जाल भान तुम्ही
पाहुनिया एकदा..
डेरेदार घट, नाजूक काया
काळ्याभोर केशलता
खजिना आहे किमती माझा...
जपून थोडा लुटा..
पण.. राया आधी.. दार जरा लावून घ्या...

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

तिच्याच रूपाने....

तिच्या ओठांचा गोडवा असा..
की मधुही मज कटू वाटे...
तिच्या हास्याची खळखळ...
जणू अम्बरि घन साचे...

थेंब गालावरूनी जेव्हा
जातो तिच्या ओघळतो..
त्याच्या नशिबाला पाहून..
जीव माझा जळतो...

तिच्या सौंदर्याच्या कडा
अप्सरेलाही लाजविति...
पावलेही नाजूक अशी
स्पर्शाने मेघात वीज नाचविती...

पाउस येतो जेव्हा, वाटे .
सौंदर्यच जणू बरसे तिचे...
तिच्याच रूपाने जणू
खुलते रूप या धरतीचे...
 हारे तो हम तब थे
जब पहली नजर मिली ती उनसे..
अब तो बस यहि उम्मिद लिये बैठे हैं
के उनको जीत ले हम.... जमानेसे
दिल में एक हलचल सी होती
कुछ ख्वाब लब्जोमें सिमट जाते हैं..
बस.. हम उन लब्जोको लिखते राहते हैं..
और कारवा बन जाता हैं...
उन्होने यु कह दिया के तुम बडे प्यारे हो..
के जान निकल के हाथो में आ गायी हमारी...
बस एक प्यारे लब्ज से यु घायल हुए हम
के हमने हमारी जान उन्हे नजर कर दी..
वो पुछते हैं.. बताओ आपको
हमारे दिल का हाल पता भी हैं..?
और हम के बस उनके दिल की
हर धडकन को याद रखते हैं..
यु अदाए दिखाती हैं वो
के कयामत आ जाए..
दिल चाहता हैं, देखतेही रहे उनको..
फिर चाहे पुरी दुनिया डूब जाए...

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०

उसके होठो में वो नशा हैं
के हर जाम फिका लगता हैं..
एकबार बस उनको छुने का
हर अंजाम फिका लगता हैं..

नजरें तो यु कातील हैं उसकी...
के कत्ल-ए-आम फिका लगता हैं..
बस एक बार मिल जाए जो नजर
मार जाना भी फिका लगता हैं..
नीडरपणा केवळ बोलळ्यातच नसतो.
कधी तो डोळे भिडवण्यातही असतो..
प्रत्येकवेळी बोलायलाच हवे असे नाही..
कधी नजरेतला इशाराही ओळखायचा असतो...
सुर्या उगवला.. पश्चिमेला..
नि ध्रुवाने सोडीली जागा.
आली ती जन्मानन्तर भेटीला..
जणू सापडला स्वर्गसुखाचा धागा...

अचानकच....

मला कधीच वाटलं नव्हतं...
कोणी माझ्या आयुष्यात येईल...
... अचानकच तू आलीस...
माझं सारं जग व्यापून गेलीस...
अक्षरशः माझ्यावर राज्य केलंस
आणि तशीच निघूनही गेलीस...
तू आलीस अन् सारं काही
अचानकच होऊ लागलं...
अचानकच तू माझी झालिस,
अचानकच मी बदलू लागलो..
अचानकच लोक म्हणू लागले..
अचानकच मी सुधारू लागलो..
तू आलीस तेव्हा वाटलं नव्हतं...
अशीच अचानक निघून जाशील...
उंच आभाळात नेऊन मला
अचानकच सोडून देशील..
अशा तुझ्या वागण्यानं मला
अचानकपणाची सवय झालीये...
तू अचानक परत येण्याची
पुन्हा मला ओढ लागलीये...

शब्दांचीच कविता होते...

शब्दांचीच कविता होते..
कवितेचे गाणे होते...
आणि एकदा गाणे झाले की ..
सतत.. भावांच्या गावी..
जाणे येणे होते..

भाव मनी दाटता. .
शब्दरूपाने बरसात येतो..
स्वर लाभता तयाला..
भाव नव्याने बरसतो ..
मनास सार्‍या भिजवून जातो
गावी स्वप्नाच्या घेऊन जातो..

म्हणून लिहिली मी कविता....

रंग... कसे दिसतात? कसे दिसणार मला?
डोळे कसे.. दिपतात? कसे... ते कसे कळणार मला?
पण जाणवते मज.. हळूवार झुळुक...
ऐकू येतो मज.. थेंब.. टूपुक...
समजते मला.. वार्याची भाषा
कळतात मज कोकिलेचे सूर.. न
पावसाची आशा..
म्हणून लिहिली मी कविता जाणीवेवर..
मात करून माझ्या.. अंधारावर..

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

एक भेट.....

खूप काही विचारायचंय
खूप काही बोलायचंय...
सांग बरं कधी भेटशील?

तुला काही सांगायचंय...
माझ्याबद्दल... तुझ्यबद्दल...
एकूणच सार्‍या जगाबाद्दल..

माझा गुन्हा जाणून घ्यायचाय...
तुझी चुक दाखवून द्यायचीये..
आजवर तू जे जे केलंस...
त्याबद्दल तुझी हजेरी घ्यायचीये..

सांग बरं... कुठे भेटशील?
देवळात...? नको तिथे गर्दी असते...
डोंगरावर?.. नको तिथे थंडी असते..
असं कर... तू स्वप्नात ये...
मला तुझ्या सोबत ने..

तुझं म्हणणं मला सांग...
माझं म्हणणं ऐकून घे.. .
मलाही थोडे प्रश्न विचार
नि माझ्याही प्रश्नांची उत्तरे दे..

खरंच देवा.. सांग कधी येशील स्वप्नात?
एकदा यायला हरकत नाही..
तसा.. सततच आहेस की..
माझ्या मनात...

... आणखी एक रात्र....

तिची आठवण तर येते खूप..
वाटते आत्ता जाउन भेटावे...
पण उगाच ती झोपलि असेल..
स्वप्नांच्या दुनियेत रमलि असेल.. तर?
का तिला.. उठवावे?
पण मग हळूच मी तिच्या स्वप्नात शिरतो..
उगाच..
तिची खोडी काढायला..
ती मस्त चांदण्यात फिरत असताना
मी तसाच तिला निरखत राहतो..
ती इतकी सुंदर भासु लागते..
की मी खोडीसुद्धा विसरतो..
असाच तिला बघत असताना
अचानक ती समोर येते..
म्हणते...
"ए वेड्या... उठ की आता..
सकाळ झाली बघ...
कुठल्या स्वप्नात रमलायेस असा..?"
उठून पाहतो तर...
खरेच सकाळ झालेली असते...
आणखी एक रात्र तिच्या स्वप्नात संपलेली असते...

हवी आहेत माणसे...

हवी आहेत माणसे...
मन असलेली...
गर्दीच्या नि गडबडीच्या या दुनियेत...
दर्दि असलेली....
हवीयेत माणसे ज्यांना समजते
समोरच्याच्या मनातली भाषा...
ज्यांना कळते दुख नि दिसते
प्रत्येक क्षणात नवी आशा...
हवी आहेत माणसे...
ज्यांना केवळ यांत्रीक जगणे जमत नाही..
ज्यांना हवे असते काहीतरी नवे...
ज्यांना एका जागी गुंतून राहणे कधीच पटत नाही..
अशी माणसे.. मिळतील का कुठे?
असतील तर सांगा पत्ता....
आपल्या मनाचा...
तिथे बोलावून त्यांना अगदी जपून ठेवा...
कारण, अशी माणसे जेव्हा भेटतात...
तेव्हा.... जीवन खर्या अर्थाने सुरू होते...