गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

श्रेय नसे माझे कसले..

"नेहमीच कसे तुझं
सांग समजते.. मनातले माझ्या..
भावना कधी मी
व्यक्त न करता..
पोहोचति कश्या मनी तुझ्या...
सांग सख्या मज...
कसे समजते...
काय हवे असे मजला..
कसे जमवसि शब्द कुठूनसे..
रचावया गझला.."
"सखे, जरी तुझं वाटे कठीण हे..
किंचितही.. नाही तसे..
शब्द शोधण्या... कुठे न जाता..
मिळती मजला...
सौंदर्यच तुझे असे...
श्रेय नसे माझे कसले..
केवळ तुला मी वर्णिले..

ती रूसते...

ती रूसते...
अन् तो तिला मनवतो...
कधी तिच्यावर कविता करतो..
तर कधी तिच्यासाठी गाणे गातो..
कधी लाडीक रागाने बोलतो..
कधी तोही रुसून बसतो...
प्रत्येकवेळी... रुसवा काढायला..
बोलावेच लागते असे नाही..
कधी एका नजरेत ती हसते...
कधी.. केवळ एक 'स्पर्श'च पुरतो...

देवाजीचे देणे...

देवाजीचे देणे...
त्यास.. आपण काय करावे?
त्याने दिले ते घ्यावे...
सर्व जगताला वाटावे...
सारे वाटून पुन्हा रिक्त व्हावे...
त्याच्या नव्या देण्यासाठी...
असेच घेऊन.. वाटत राहून...
पुन्हा पुन्हा रिक्त व्हावे...
समस्त जगाच्या भल्यासाठी..

छोटीशी.. छानशी.. कविता

छोटीशी? छानशी?
कविता तुला..
ऐकवुच कशी मी?
मनी जे दाटे.. मला जे वाटे..
भावना तुझ्यासाठीची...
मोजक्याच शब्दात...
मांडू कशी मी?
रूप तुझे जे आरसपाणी...
पाहता तुला होते
धुंद ही अवनी...
सांग तूच सखे...
इवल्याश्या काव्यात
वर्णू कशी मी.. ?
छोटीशी.. छानशी..
कविता तुला...
ऐकवुच कशी मी?

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

अमावस्या?

अमावस्या असली..
तरी तिला मात्र चंद्रच हवा असायचा..
तारे कितीही लुकलुकले..
कितीही सुंदर दिसले..
अगदी संपूर्ण अवकाश जरी त्यांनी व्यापले..
तिला ते आवडले तरी म्हणायची..
"चंद्र असता तर आणखी मजा आली असती नाही?"
किंवा कधी म्हणायची..
"चंद्रप्रकाशातले जग काही निराळेच"
झाले.. छान गप्पा चालू असताना..
ते दोघे प्रेमात दंग असताना,
ती अशी काहीसे म्हणायची..
एक दिवस ना राहवून
तो तिला म्हटला..
"सखे, चंद्र हवा असतो तुला..
त्याची उणीव भासते तुला..
पण, मला नाही भासत कधी त्याची उणीव..
अन् त्या तारयांनाही नसेल वाटत असे काही..
कारण, माझ्यासाठी, त्यांच्यासाठी..
अमावस्या कधी होतच नाही..
चंद्र नसेल उगवत कदाचित त्या रात्री..
पण तुझ्या रूपाने असतोच ना तो समोर.."
सखी काय म्हणणार..
कौतुकाने पाहत राहते..
त्याला.. अन् तारयांना...