बुधवार, ३० सप्टेंबर, २००९

ती आणि तो... यांचा संवाद

ती - तुझं माझ्यावर प्रेमच नाही... माझ्याबद्दल तुला काही वाटतच नाही...
तो - असे तुला का वाटते? तुझ्याकडे माझे लक्ष नसते....
ती - तुला आठवतय? आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी हीच पर्स आणली होती??
तो - आणली होतीस .. बहुतेक... माझ्या नाही लक्षात...
ती - आणि आपण याच हॉटेलच्या त्या कोपर्‍यातल्या टेबल वर बसलो होतो??
तो - हो बहुदा.. तेच टेबल होते.. कॅया ग ?
ती - बघ.. तुला नीट आठवत ही नाही.. म्हणून म्हणते.. माझ्या बद्दल तुला काहीच वाटत नाही..
तो - अस कस म्हणतेस तू?? आग मी काय टाइम टेबल करून ठेवलाय???
ती - मग काय मी करून ठेवलाय??? तरी माझ्या लक्षात आहे ना?? मी विसरले नाहीच ना...
तो - बर बाई याच्यापुढे तू सांगशील ते ऐकीन.. आपल्यातली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवीन.. मग तर झाले? मग सांग राणी काय करायच??
ती - तुला कस रे काळात नाही... मला आत्ता काय हवाय तेही तुला समजत नाही??
तो -अग पण तू सांगशील तर कळेल ना...
ती - अस अजिबात चालणार नाही.. तूच सगळ ओळखायला हव... मझ मन तुला समजायला हव...
(आता काय बोलणार बिचारा... थोडावेळ शांतच राहिला... )
ती -ठीक आहे तू म्ानशील तस...
तो -(आत्ता कस.. .)

***************************************************************************

पाखरू..

एक पाखरू... चुकलेलं
आईच्या मायेला... मुकलेलं..
घरतानही त्याचं.... तुटलेलं
फिरून फिरून.. थकलेलं..

त्याचंही एक घरट होतं..
त्याचंही एक जग होतं..
त्याचीही काही स्वप्नंहोती..
त्याचीही एक झेप होती..

नियतीनं मात्र घातला घाला..
वादळ आलं, घरट मोडळं...
आई हरवली, स्वप्न भंगलं...
क्षणात सारं संपून गेलं..

फिरून फिरून थकल तरी
पाखरू कधीच खचलं नाही..
नियनीनं सारं नेलं तरी
जगण्याची उमेद सोडली नाही..

आज त्याचं घरट आहे..
आज त्याचं जगही आहे..
मनात नियतीचे घाव तरीही
चेहर्यावर प्रसन्न भाव आहे..
झोपली असावी ती बहुदा...
चांदण्यांची चादर ओढून...
अलगद उशाशी चंद्र घेऊन...
रात्रीच्या कुशीत...
असेल सुंदर सुंदर स्वप्ने बघत...
हसेल गालातल्या गालात..
अगदी खुशीत... कुणीतरी भेटल्याच्या...
काहीतरी सापडल्याच्या..
किंवा.. मनासारखे झाल्याच्या..
अशीच ती झोपलेली असताना..
तिच्या गालावरून एखादे मोरपीस फिरवावेसे वाटते...
तिच्या सुंदर पापण्यांचा चंद्र पहात राहावेसे वाटते..
अगदी रात्रभर...
तिच्या त्या गोड गुलाबी ओठांना हळूच स्पर्श करून..
एक गोड पापी घ्यावीशी वाटते..
पण हे सगळे करताना कदाचीत तिला जाग तर येणार हानी ना?
अशी शंका उगीचच मनात येत रहाते..
पण खरे तर ती माझ्याशीच बोलत असेल स्वप्नभर..
करत असेल हट्ट तिला त्या आकासभर चांदण्यात फिरवून आणण्याचा...
नक्षत्रांची एक एक पायरी चढत अगदी दूर स्वप्नांच्या गावी नेण्याचा..
तरीही तिला ना उठवता अलगद तिच्याच शेजारी मी पहूडतो..
अन् मीसुद्धा तिलाच शोधत स्वप्नात.. हीडू लागतो..
माझ्याच मनात..

मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

सकाळी उठल्यावर ऐकू येणारी
एक मधुरशी हाक सांगून जाते...
देणारा दिवस सुखद असल्याची
ग्वाही देऊन जाते...
अशीच एखादी हाक रोज कानावर यावी,
अन् रोजची सकाळ अशीच माधुर्याने भारुन जावी...


आपला दिवस शुभ जाओ ही सदिच्छा...

किल्ले प्रतापगड....


स्वराज्याच्या सामर्थ्याचा आणि शिवपराक्रमाचा साक्षीदार... कोकणच्या सफरीवर जाताना घेतलेला पहिला थांबा, प्रतापगड... नुकताच पाओस होऊन गेला होता. आणि सर्वत्र करवी बहरली होती. जावळीचे जंगल, हिरवाईचा शालू पांघरालेला गड आणि त्यावर नक्षीकाम, निरनिराळ्या रानफुलांचे.. असे दृष्य अनुभवत काहीसा वेगळा अँगल शोधत किल्ला पाहण्याचा केलेला हा एक प्रयत्न....


http://picasaweb.google.com/veebee009/Pratapgad#

... असेल हिंमत .. तर अडवा...

ठलाय मराठी माणूस..
पण जागा नाही झाला अजुन..
उतु लागलाय आयुष्यातून..
पण सावरला नाहीए अजुन..


अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..
समजून ना समजयची आवड संपलेली नाही…
असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…
मराठी माणूस नकाशात नाहीतर,
इतिहासाच्या पुस्तकतच दिसेल..


म्हणून म्हणतोय मित्रांनो.. हीच आहे खरी वेळ..
जागे व्हा.. उठा आणि
"वाहू दे पुन्हा तेच मराठी रक्त धमन्यांमधून.. "
ज्याने बदलला भूगोल.. या हिंदुस्थानचा..
रचला नवा इतिहास.. मराठीच्या अस्मितेचा..


दाखवून द्या जगाला.. जर आम्ही जाउ म्हटले पुढे.. तर..
नाही कोणीच येऊ शकत आमच्या मध्ये..
आणि जर कोणाला वाटतच असेल.. तर सांगू त्यांना.. छातीठोक


... असेल हिंमत .. तर अडवा...

आता आहे प्रश्न पडला....

रोज काही लिहीत रहावे
आहे असे काहीसे ठरवले...
पुन्हा प्रयत्न करायचा,
मिळवायचे जे जे हरवले....

होती कधी सवय मला
फक्त कवितेतून बोलायची..
जे जे यायचे मनी ते
यमकातून मांडायची...

पण आता आहे प्रश्न पडला
यमके कशी जुळवायची ?
मनीच्या भावांची कवितेतून
भट्टी कशी जमवायची

मीच आहे फक्त माझा...

एकट्याने आलो आणि एकट्याने जायचे...
का तरीही कोणी यावे.. आशेवर या जगायचे?
मी कोणाचा.. कोण माझा.. कोणी हे ठरवायचे..
मीच आहे फक्त माझा... लक्षात हे ठेवायचे..