उठलाय मराठी माणूस..
पण जागा नाही झाला अजुन..
उतु लागलाय आयुष्यातून..
पण सावरला नाहीए अजुन..
अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..
समजून ना समजयची आवड संपलेली नाही…
असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…
मराठी माणूस नकाशात नाहीतर,
इतिहासाच्या पुस्तकतच दिसेल..
म्हणून म्हणतोय मित्रांनो.. हीच आहे खरी वेळ..
जागे व्हा.. उठा आणि
"वाहू दे पुन्हा तेच मराठी रक्त धमन्यांमधून.. "
ज्याने बदलला भूगोल.. या हिंदुस्थानचा..
रचला नवा इतिहास.. मराठीच्या अस्मितेचा..
दाखवून द्या जगाला.. जर आम्ही जाउ म्हटले पुढे.. तर..
नाही कोणीच येऊ शकत आमच्या मध्ये..
आणि जर कोणाला वाटतच असेल.. तर सांगू त्यांना.. छातीठोक
... असेल हिंमत .. तर अडवा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा