मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

पौर्णिमेच्या चांदण्यात

पौर्णिमेच्या चांदण्यात
ती भेटीला येते...
जणू, स्वर्गीची कोणी अप्सराच
माझ्या सामोरी येते...
सौंदर्यकडांवरून तिच्या
जेव्हा चांदणे फिरते...
अप्सरेची कल्पनाही मग..
केवळ खूजी वाटते..
ओठांवरुनी थरथरणार्‍या
माझा स्पर्श जेव्हा फिरतो...
सौंदर्य तिचे जणू मग..
परिपूर्ण वाटते...
प्रणयात तिच्या मी.
मग चांदण्यात त्या
असा धुंध होतो...
चंद्रास्त होतो, रात्रही संपते...
तरीही केवळ तिच्या
स्वप्नात मी रमतो...

शृंगार... तिचा अन् माझा

तिच्या माझ्यातले अंतर ..
जेव्हा कमी होते..
जणू, शृंगारालाही तेव्हा..
भरभरून येते..

तारुण्य तिचे नि माझे..
जेव्हा.. एकरूप होते..
चंद्रकिरणासही मधून शिरण्या...
जागा न उरते..

श्वासांतून वाहू लागता
श्वास तिचा माझा..
प्रलयालाही स्पर्धा करण्या
ताकद ना मिळते...

प्रेमास तिच्या अन् माझ्या
जेव्हा उधाण येते...
प्रेमदेवतेलाही मग
काही सुचेनासे होते...

भूतकाळ येतो... आणि ...

एक दिवस अचानक समोर येतो...
भूतकाळ..
असा भूतकाळ, ज्याने आपल्याला
वेड लावलेले होते..
ज्याच्याशिवाय.. कधीकाळी..
जगनेही मुश्कील झालेले होते..
असा भूतकाळ.. जो कधी वर्तमान होता...
भविष्य होता..
पण.. पण अचानक..
काळाच्याच कोण्या खेळाने..
आपल्यापासून दुरावला होता..
भूतकाळ... आपले प्रचंड प्रेम असलेला..
आपल्याला प्रचंड त्रास दिलेला..
आपल्या संपूर्ण भविष्यावर ज्याचे सावट कायमचे पसरले गेले...
असा एक भूतकाळ...
तो सामोरा आला की आपण भले म्हणतो..
"जा, नाही काही अडत माझे तुझ्याविना...
जा.. काडीमात्रही किंमत नाहीए आता तुझी मला... "
पण खोलवर मनात मात्र...
पुन्हा सार्‍या जुन्या जखमा
ताज्या झालेल्या असतात...
पुन्हा सार्‍या भावनांनी
एकच उच्छाद मांडलेला असतो...
केवळ त्या भूतकालाच्या झलकेनेच...
सारा सारा आयुष्याचा ताळमेळ
बिघडलेला असतो...
असा भूतकाळ येतो... आणि
शून्यातून सुरूवात करून निर्माण केलेल्या नव्या आयुष्यलाही...
पुन्हा एकदा शून्यावर नेऊन ठेवतो...

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

मी.. प्रेमात बुडालेला..

तू काळी मोगर्‍याची
वा झुळुक वार्‍याची
मी सुगंध वाहणारा....

तू वीज कडाडनारी..
वा कृष्णमेघांची दाटी....
मी कोसळत्या धारा...

तू परी स्वप्नातली..
वा राणी सत्यातली..
मी.. स्वप्न पाहणारा..

तू व्याख्या प्रेमाची
वा जाणीव अस्तित्वाची..
मी.. प्रेमात बुडालेला..

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

...याच कारणे...

एकदा... भेटता विचारले तिने..
"सांग नवे काय माझ्या दिसले, आज तुला?"
सांगितले मी तिला..
"प्रिये, तशी तर रोजच भासतेस तू नवी..
खास असे काय सांगू मी तुला?"
म्हणाली.. "असे उत्तर चालायचे नाही..
नवे काय ते ओळखल्याशिवाय
माझ्याशी बोलायचे नाही.."
मग मात्र मी म्हटलो तिला..
"सखे, तू येताच समजले होते मला..
तू माळलीस मोगरी गजरा..
चाहूल तुझी लागली मज..
जेव्हा नवपैंजण तुझा वाजला.."
ऐकताच सखी मग पुन्हा बिलगली..
पुन्हा एकदा मिठीत शिरली..
काही न बोलता बोलून गेली..
"सख्या, याच कारणे प्रीत तुझ्यावर जडली..."

लिहायचो मी..

असेच काहीसे लिहायचो मी..
वर्णन तिचे कधी करायचो मी...
कधी सौंदर्याचे तिच्या...
तर कधी प्रेमावर तिच्या लिहायचो मी..

भेटायची मला जेव्हा ती..
केवळ पहात राहायचो मी..
एकाच तिच्या नजरेने नेहमी..
पुरता घायाळ व्हायचो मी..

आताही लिहितोच आहे..
वर्णन तिचे करतोच आहे...
पण, आता आहे सोबतीस ती माझ्या..
पुर्वी... स्वप्नातच केवळ पहायचो मी..

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

विचारांचा पाउस...

विचारच करत होतो...
की विचार काय करावा?
अन् विचार करून
त्याचा उपयोग काय करावा?

आणि तेवढ्यात अचानक
एक विचार मनी आला..
विचार.. कधी, कुठे, कसा...
विचार.. करावाच कशाला?

विचारच करायचा तर..
विचारच करायला हवा..
इतक्या सगळ्या प्रश्नाचा
विचार का असावा?

विचाराच्या इतक्या विचाराने
डोक्यात विचारांचा ढग होतो
विचार करत असतानाच अचानक..
आणखी विचारांचा पाउस पडतो...

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

गाव मात्र एकटं झालंय...

रस्त्यावरून दिसणारं एक गाव..
पावसात भिजून चिंब झालंय..
पावसाच्या प्रत्येक थेंबानं..
गावाचं सौंदर्य खुलू लागलंय..

गावात शिरताच दिसून येतं
गावात समस्यांचच रान माजलंय
गावात माणसं असूनसुद्धा
गाव आतून एकटं झालंय..

मागल्या सालिही पडला पाउस..
धरणात भरून वाहिलं खूप
पाणी मात्र नंतर सारं
शहरासाठी वाहून गेलंय..

पाउस गेला उन पडलं..
गावातलं सारं आटून गेलंय
गावात धरण असूनही
गावातलं ढोर तहानेन मेलंय

या सारयचा कंटाळा येऊन..
पोटा-पाण्याचा प्रश्न घेऊन
प्रत्येक पोर आता शहरात गेलंय
गाव मात्र एकटं झालंय...

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

तिची तक्रार.. त्याचे उत्तर...

तिची तक्रार..

तू मला साधा फोन करत नाहीस..
माझी तुला कधी आठवणच येत नाही..

आलीच असती..
तर निदान एखादा मेसेज केला असतास...
नव्हताच इतका वेळ..
तर मिस्ड कॉल तरी दिला असतास...
पण यातले काही झालेच नाही..
कारण.. तुला माझी आठवनच येत नाही...

कधी माझा वाढदिवस विसरतोस..
कधी आपण भेटल्याची तारीख..
आपण एकत्र फिरायला गेलो..
ती पहिली जागाही तुझ्या लक्षात नाही..
कारण... तुला माझी आठवण येत नाही..

त्याचे उत्तर...

मेसेज करायला किती वेळ लागतो ग..
पण तो करतानाही कधी कधी
कविता मला सुचत नाही..
आणि साधा एखादा मेसेज करणे..
खरेच बरे वाटत नाही..

साधा मिस्ड कॉल द्यावा म्हटले
तरी.. बरे वाटत नाही..
तुला फक्त मिस करणे..
माझ्या मनाला तरी पटत नाही..

आठवण आली.. कॉल केला
की गप्पा मारत राहतो मी..
माझे सारे काम विसरून..
तुझ्यात गुंतत जातो मी..


म्हणूनच सखे.. आठवण येऊनही..
तसे कधी मी दाखवत नाही..
पण.. असे केल्याने तुझ्यावरचे..
माझे प्रेम कधीच कमी होत नाही..