मंगळवार, २७ जुलै, २०१०

पाउस अचानक येतो..


सखी येत असता भेटण्या त्याला..
पाउस अचानक येतो..
सखिला उशीर होतो..
अन् प्रियकर तिजसाठी झुरतो..

पाउस थोडा विसावतो...
सखी भेटण्या प्रियाला निघते..
सखी वाटेवरती असता..
पाउस पुन्हा बरसतो..

सखी भिजते.. तशीच निघते..
प्रियाला भेटण्या पोहोचते..
पाहताना साखिला येताना
प्रियकरही आनंदून जातो...

पाहता भिजलेल्या साखिला
प्रियकर मोहित होतो..
ती मिठीत त्याच्या शिरता
पाउस पुन्हा जोर घेतो..

प्रेमास त्यांच्या फुलवण्या
पाउस.. असाच नेहमी येतो...

मंगळवार, १३ जुलै, २०१०

कवीने जगायचे... वाचकाने.. केवळ पाहायचे..

कवीने लिहायचे असते...
स्वतःच्या अनुभवातून...
वाचकाने वाचायचे ते...
त्याच्याच चश्‍म्यातून

कधी साकारायचे कवीने..
नवे जग कल्पनेतून..
वाचणार्याने पाहायचे...
त्यात काही काळ राहून..

कवीने म्हणायचे...
वाचकाने ऐकायचे...
कवीने जगायचे...
वाचकाने.. केवळ पाहायचे..

कवीच्या जगात वाचकाने
कायमचे राहायचे नसते...
कारण, कवीला कवीचे...
अन् वाचकाला.. वाचकाचे...
स्वतःचे आयुष्य जगायचे असते...

पाउस... असाच येतो...

पाउस... आठवायला लागत नाही..
तो अचानक कोसळतो..
कधी मेघांतून... कधी मनातून..

तो मेघांतून बरसतो...
थेंबांच्या धारा होऊन..
कधी मनातून बरसतो..
आठवणींचा वारा होऊन..

कधी येतो तो लेखणीतून..
शब्दांच्या गारा होऊन..

कधी डोळ्यांतून बरसतो..
सुख-दुःखाच्या आसवांतून...
कधी ओठांतून खुलतो..
निखळ हास्यातून...

पाउस... असाच येतो...
निरनिराळ्या रुपांतून...

गोष्ट तिची अन् त्याची....

तीच रोजचीच गोष्ट... तिची अन् त्याची..

तो अन् ती.. जणू राजा अन् राणी..
वेगळी नसेलही कदाचित..
पण.. एक सुंदरशी प्रेमकहाणी...

सुरू होण्याआधीच संपणारी...
संपूनही कधीही न संपणारी..
अधुरिच खरी...
पण मनाला भावणारी..

त्या दोघांची म्हणता म्हणता...
माझी नि तुमची होणारी..
गोष्ट तिची अन् त्याची....
__________________विनायक बेलोसे

शुक्रवार, ९ जुलै, २०१०

"संवाद"... तो व्हायला हवाय...

तडा गेला तो गेलाच...
त्या दोघांच्यातल्या विश्वासाला...
कारण.... काहीही असो...
तडा गेला.. हे खरे....

तिचे म्हणणे एकच... 
"त्याचे माझ्याकडे लक्षच नाहीए...
मीच नेहमी त्याला समजून घ्यायचे...
ही त्याचीही जाजबदारी नाहीए?"
तो इकडे कामात गुंग...
तिच्यासाठी मोठे व्हायचेय म्हणून...
जमेल तितकं कमवायचंय...
तिला त्रास होऊ नये म्हणून...

त्याला वाटे... "ती केवळ भांडत राहते..
मला समजून घेतच नाही...
कधी मला तिची गरज असते...
केवळ मन हलकं करण्यासाठी...
पण ती काही ऐकतच नाही... "
तीही तिकडे कामात मग्न...
त्याला वेळच नाही म्हणून...

दोघे बरोबर... आपापल्या जागी...
पण एकच गोष्ट दोघांत होत नाही...
"संवाद"... तो व्हायला हवाय...
मग काहीही बिघडत नाही...

गुरुवार, ८ जुलै, २०१०

क्षणाचाच मी...

क्षणात हिरवा.. क्षणात पिवळा..
क्षणात होतो मी कधी गहिरा..
क्षणाचाच तो विलंब केवळ..
क्षणात उदास मी.. क्षणात हसरा..

क्षणाक्षणाला बदलत जातो..
क्षणात ऋतूही मागे पडतो...
क्षणात कधी मी इतका बदलतो..
क्षणातच ऋतूला पुन्हा गाठतो...

क्षणच काय तो मजसोबत पळतो..
क्षणाबरोबर मी ही पळतो..
क्षणाचाच मी... क्षणही माझा...
कधी तो क्षणही मजवर जळतो...

गुरुवार, १ जुलै, २०१०

गूढ.. अगम्य... केवळ सावली...

निशब्द.. शांतता...
कशाचही आवाज नाही...
आस-पास कोणी ही नाही...
केवळ... निशब्द शांतता..

त्यातून येणारा एक आवाज..
घुंगरांचा... मधुर...
अगदी काळजाला भिडणारा...
त्या निशब्द शांततेला...
मधूनच चिरणारा....

मागून येणारी सावली...
कोण्या अद्न्यात व्यक्तीची...
कोणाची? माहीत नाही...
केवळ सावलीच ती...

भविष्यात होणार्‍या एखाद्या
अघटीताची तर नाही?
कोण जाणे...
पण.. सावली दिसतीये खरी..
गूढ.. अगम्य... केवळ सावली...