मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

पुन्हा ती....

पुन्हा.... "ती"च...

आता तुम्ही म्हणाल ही "ती" पुन्हा कशी?
आधीच स्पष्ट करतो... ही "ती" म्हणजे मला सोडून गेलेली नाही..
ही तर "ती".. जिला माझ्या बद्दल सारे काही माहीत असताना जिणे मला स्वीकारले... मला समजून घेतले, आणि माझा भूतकाळ पूर्णपणे माहीत असूनही माझ्यासोबतच आयुष्य काढायचे ठरवले... ती....



ती...
जिने मला सावरले..
जिने मला पुन्हा एकदा आयुष्य जगायला शिकवले..
जिने पुन्हा एकदा माझ्या पंखात बळ दिले...

ती...
जिला नेमके ठाऊक होते...
माझ्या भूतकाळात नक्की काय दडलंय...
त्यातूनही तिला नेमकं काही असं सापडलंय...
ज्यामुळे मला नेमका मार्ग मिळाला..
आयुष्य पुढे नेण्यासाठी...
जिने प्रत्येक पावलावर काही असे दिले...
ज्याने मला काही क्षण दिले...
आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी...

ती...
तीच तर आहे आता माझे भविष्य...
तीच तर आहे माझे सारे आयुष्य...
केवळ तिच्यासाठीच प्रत्येक गोष्ट करावीशी वाटते...
ती रूसळी.. वा समोर जरी नसली...
तरीही मनी भीती दाटते...
ती... मला सोडून जाण्याची..
अगदी खात्री असूनही... की ती जाणार नाही..
कधीच....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा