येता तिथी आषाढाची
लागे ओढ पालखीची
निघे वारी भक्तजणांची
घेण्या भेट विठ्ठलाची||१||
त्याचे मस्तकी चंदन
त्याचे कटीवर कर
रंग सावळा देवाचा
त्याने ल्याले पीतांबर||२||
रूप असे गोजिरे त्याचे
घेण्या भरूनीया डोळा
गावागावातून निघून
वारकरी येथे आला||३||
अश्या विठ्ठलाची व्हावी
कृपा अवघ्या जगतावर
सुखे नान्दो सर्वजण
हेची मागने तत्पर ||४||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा