भारत, एक प्राचीन देश. तसा देश आत्ताचा पण प्राचीन प्रदेश... म्हणता येईल.. अगदी खंडप्राय देश असेही म्हणता येईल... तर या खंडप्राय प्रदेशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अगदी रामायण-महाभारत, वेद-पुराणांपासुनचा.. अगदी जेव्हापासूनाच्या कथा-दंतकथा, कागदपत्रे, भौगोलिक पुरावे या सर्वांतून लक्षात येते, की या देशात अनेक राज्ये होती. आणि ती गेल्या हजारो पिढ्यांमध्ये अनेक राज-घराण्यांकडे होती. अगदी, हैदराबादच्या निजामाचा पाडाव होईपर्यंत. आणि त्यानंतर भारत पूर्णतः एक झाला. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारिपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत. भारत स्वतंत्र झाला. त्यात भाषेच्या आधारावर प्रांत पाडले गेले. सारे काही ठीक चालू असतानाच पुन्हा काही क्षेत्रीय नेत्यांनी, सामाजांनी, आपल्यावर अन्याय होत असून आम्हाला वेगळे राज्य हवे अश्या मागण्या सुरू केल्या. त्याचीच परिणती, झारखंड, छत्तिसगड अश्या राज्यांच्या उदयात झाली.
बरे, हे सारे एवढ्यावर थांबलेले नाहीए.
उत्तर-पूर्वेत, बोडोराज्य,
उत्तरप्रदेशात - हरितप्रदेश, पूर्वांचल. एवढेच काय तर उत्तर-प्रदेश, बिहार, छत्तिसगड येथील काही भागांचे मिळून भोजपुर राज्यही केद्र-शासनाकडे प्रस्तावित आहे.
मध्यप्रदेशात - बुंडेलखांड
बंगाल मध्ये - गोरखाराज्य, ग्रेट न्यू कूच बिहार
आंध्रप्रदेशात - तेलंगाणा
कर्नाटकात - कुर्ग, तुलुराज्य
महाराष्ट्रात - विदर्भ, कोकण (स्वतंत्र कोकणराज्य पक्षसुद्धा आहे), मग कदाचित मराठवाडा, खानदेश...
तामीळनाडूमध्ये - वानमाई - यात कर्नाटक, आंध्र, आणि तामीळनाडू यांच्या एकत्रित सीमारेशेवरील 'वेन्नियार' लोक एक वेगळ्या राज्याची मागणी करीत आहेत.
गुजरात- सौराष्ट्र.
बिहार - मिथिलांचल.
राजस्थान - राजपुताना
ही यादी अशीच वाढत जाणार काय?
यापैकी १० राज्यांचा प्रस्ताव आत्ताच केंद्रशासनाकडे आलेला आहे.
आपण पुन्हा एकदा जुन्या भारताकडे चाललो आहोत काय? याचे परिणाम काय होतील? भारत एक देश म्हणून अस्तित्वात राहील?
नक्की कशामुळे होतेय हे सारे? राजकारण? लोकांची इच्छा? की आणखी काही?