बुधवार, ३० सप्टेंबर, २००९

झोपली असावी ती बहुदा...
चांदण्यांची चादर ओढून...
अलगद उशाशी चंद्र घेऊन...
रात्रीच्या कुशीत...
असेल सुंदर सुंदर स्वप्ने बघत...
हसेल गालातल्या गालात..
अगदी खुशीत... कुणीतरी भेटल्याच्या...
काहीतरी सापडल्याच्या..
किंवा.. मनासारखे झाल्याच्या..
अशीच ती झोपलेली असताना..
तिच्या गालावरून एखादे मोरपीस फिरवावेसे वाटते...
तिच्या सुंदर पापण्यांचा चंद्र पहात राहावेसे वाटते..
अगदी रात्रभर...
तिच्या त्या गोड गुलाबी ओठांना हळूच स्पर्श करून..
एक गोड पापी घ्यावीशी वाटते..
पण हे सगळे करताना कदाचीत तिला जाग तर येणार हानी ना?
अशी शंका उगीचच मनात येत रहाते..
पण खरे तर ती माझ्याशीच बोलत असेल स्वप्नभर..
करत असेल हट्ट तिला त्या आकासभर चांदण्यात फिरवून आणण्याचा...
नक्षत्रांची एक एक पायरी चढत अगदी दूर स्वप्नांच्या गावी नेण्याचा..
तरीही तिला ना उठवता अलगद तिच्याच शेजारी मी पहूडतो..
अन् मीसुद्धा तिलाच शोधत स्वप्नात.. हीडू लागतो..
माझ्याच मनात..

1 टिप्पणी: