मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

निर्णय

चुकीच्या म्हटलेल्या गोष्टी
नेहमीच चुकीच्या असतात?
योग्य म्हटलेल्या गोष्टी
कधीच का चुकीच्या नसतात?

परिस्थितीच्या गरजेनुसार
प्रत्येकजण वागत असतो
त्या क्षणी, त्या परिस्थितीत
प्रत्येकजण बरोबर असतो..

मग मागाहून त्या गोष्टी
चुकीच्या म्हणण्यात काय अर्थ?
असंच जर म्हणायचं असेल
तर सारं जीवनच होईल व्यर्थ

म्हणूनच घेतलेल्या निर्णयावर
ठाम राहता यायला हवं..
पुढं येणार्‍या प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर देता यायला हवं

नाहीतर जगाच्या संगण्यानुसार
आपण प्रत्येक गोष्ट करतो
आयुष्याच्या शेवतो मात्र
आपणच मूर्ख ठरतो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा