बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०

ओढ कशाची असे मनाला...

सामोरी येता तू सखे
हरवतो डोळ्यात तुझ्या...
नसशी समोर जेव्हा तू..
आठवतो नजरेस तुझ्या...
सांग मला मग कधी बोलावे...
काय माझ्या मनात असे अन्..
कसे सांगावे सखे तुला...
नित्याचेच झाले हरवणे..
आठवणे.. केवळ तुला...
सांग सखे मी राहू कसा..
जर दिसली नाहीस तू... कधी मला...
मला ना ठावे काय असे हे..
का हे घडावे, माझ्यासवे...
ओढ कशाची असे मनाला...
प्रेम का जडले.. तुझ्यासवे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा