शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

त्या दोघांची... चंदेरी भेट

पावसाळा नुकताच संपलेला...
संध्याकाळची वेळ....
नदीचा तीर... खळखलणारे पाणी..
आकाशी चाललेला रंगांचा खेळ...

पश्चिमेने उधळलेल्या रंगछटा
अश्याच काहीश्या सखीच्या केशलता...
तिचे मावळतीच्या खेळात मग्न होणे...
त्याचे मात्र तिच्याकडे पहाणे...

मधूनच एखादी वार्याची झुळुक..
अंगावर आणते शहारा हळूच..
कातरवेळी त्याचा तिला स्पर्श..
शृंगाराचीच जणू देई चुणूक...

मावळतीला अंधार दाटत जातो...
पूर्वेहून मग चंद्रकला उगवते..
त्या दोघांची भेट तेव्हा पूर्ण होते...
जेव्हा... चंद्राने रात्र चंदेरी होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा