कवी ग्रेस गेले...
त्यांच्या जान्याने माझ्या मनीच्या भावना त्यांच्याच एका गाजलेल्या कवितेला स्मरून इथे व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...
'तो' गेला सोडूनि सर्वांना
तेव्हा सूर्य तापला होता..
'त्याच्या' जाण्याच्या दुःखाने
सार्या दुनियेवर कोपला होता
'तो' सार्यांना देऊन गेला
नवदृष्टी जग पाहण्याची..
'तो' निर्माण करून गेला
पोकळी कधी न भरणारी...
'तो' बोलत होता काही
समजलेच नाही कोणी
'त्याने' इतके देऊनीसुद्धा
रिकामीच आपुली झोळी
--------------------------- विनायक बेलोसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा