सुगंध चढे रातीला अन्
चंद्र होई वेडापिसा
तो सुंगंध तुझा वा
रातराणीचा सांग सखे..
ओळखावा कसा?
प्रकाश रूपेरी पडतो अन्
लागते सृष्टी उजळाया
तो चंद्र चमकतो वा
उजळवते सृष्टी, सांग सखे,
तुझी काया?
चंद्र, तारे, अवकाश, धरती
मग भरून जाती
मदहोश अशा स्वप्नाने
तो भास असे वा
होतसे ही जादू, सांग सखे,
तुझ्या असण्याने?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा