मंगळवार, ३१ मे, २०११

सारे पुन्हा... तेच तेच...

तोच क्षण... तीच जागा...
तोच पाउस... अन् तीच तू...
त्याच ओढीने पुन्हा...
तोच भिजलेला ऋतू..

तोच खळाळणारा निर्झर
अन् आकाशी तेच इंद्रधनू..
तुझ्या माझ्या भेटीस सारे
निसर्गानेच घडवले जणू..

त्याच माळरानी पुन्हा
तेच विहरते पाखरू...
त्याच तुझ्या या पापण्या
जणू उडणारे फुलपाखरू...

तोच वारा झोंबणारा
मेघ नभी लागले दाटू..
तोच विजेचा कडकडाट
अन् तीच पुन्हा मिठीत तू..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा