पाउस, साजणी येतो
तुझ्या निखळ हास्याप्रमाणे..
ओसंडून वाहते नदी
तुझ्या मुखीच्या आनंदाप्रमाणे..
चंद्र मग लपतो जाउनी
त्या नभाच्या आडोशाला
दृष्ट न लागावी म्हणूनी
तुझ्या अलौकिक सौंदर्याला
वीज कडाडून जाते कधी
जणू चमक तुझ्या नयनांची
निसर्ग हिरवा होतो ही...
जादू तुझ्याच अस्तित्वाची...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा