मंगळवार, १९ एप्रिल, २०११

ती..........

तिच्या केवळ चाहूलीनेच
त्याच्या अंगावर शहारा यायचा...
ती समोर आली की जणू
ग्रीष्मातही शरदाचा भास व्हायचा..

तिच्या नजरेतून जणू
चांदण्याची झलक मिळायची..
तिच्या कोमल आवाजाने
सारी सृष्टी मोहून जायची..

तिच्या येण्या जाण्यानेच
इतके सारे व्हायचे..
की जणू... सार्‍या जीवनाचे..
सार्थक होऊ पाहायचे...

ती आली होती..
खूप काही घेऊन..
अन् गेली तेव्हा...
सारे घेऊन गेली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा