मंगळवार, २९ मार्च, २०११

तू नसलीस..

मेघ नसतात,
आभाळ अगदी निरभ्र असतं...
पण माझ्या डोळ्यांना मात्र
ते भरून आलेलं दिसतं..
लख्ख सूर्यप्रकाश असतानाही..
अंधारुन आल्यासारखं वाटतं...
कधी, रात्रीचा चंद्र छान खुलून हसतो..
मला मात्र तो उदास भासतो..
तारकांनी भरलेलं असतं आभाळ
मला मात्र अगदीच रिकामं वाटतं असतं...
तू नसलीस..
की हे असं काहीसं होत असतं..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा