तो आला..
थंडगार वार्यावर
मृद्गंध स्वार झाला..
भेगाळलेल्या धरेसाठी
कृष्णमेघ जलधार झाला..
तो आला.. अन्
पाणावलेल्या डोळ्यांमधले
खारे पाणी मधुर झाले..
उन्हात जळुनी कोमेजलेले
मन पुन्हा मोहरुन आले..
तो आला.. अन्
सारी सृष्टी
पुन्हा नव्याने खुलू लागली..
आनंदाच्या महापुराने
दुःखे सारी धुवून गेली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा