चंद्र उगवला..
बर्याच दिवसांनी..
तरीही रात्र काळोखीच होती..
तारे सारे खुशीत होते...
रात्र अजुनही दुःखीच होती..
एक चांदणी उतरून आली..
धरेवर काहीशी शोधू लागली..
तेव्हा तिला गमक उमजले..
रात्रीच्या दुःखाचे कारण समजले..
'त्याची' सखी अजुन आली नव्हती..
हे पाहून सृष्टी कोमेजली होती..
अन् म्हणूनच कदाचित...
चंद्र उगवला... बर्याच दिवसांनी..
तरीही.. रात्र काळोखीच होती..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा