शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

अमावस्या?

अमावस्या असली..
तरी तिला मात्र चंद्रच हवा असायचा..
तारे कितीही लुकलुकले..
कितीही सुंदर दिसले..
अगदी संपूर्ण अवकाश जरी त्यांनी व्यापले..
तिला ते आवडले तरी म्हणायची..
"चंद्र असता तर आणखी मजा आली असती नाही?"
किंवा कधी म्हणायची..
"चंद्रप्रकाशातले जग काही निराळेच"
झाले.. छान गप्पा चालू असताना..
ते दोघे प्रेमात दंग असताना,
ती अशी काहीसे म्हणायची..
एक दिवस ना राहवून
तो तिला म्हटला..
"सखे, चंद्र हवा असतो तुला..
त्याची उणीव भासते तुला..
पण, मला नाही भासत कधी त्याची उणीव..
अन् त्या तारयांनाही नसेल वाटत असे काही..
कारण, माझ्यासाठी, त्यांच्यासाठी..
अमावस्या कधी होतच नाही..
चंद्र नसेल उगवत कदाचित त्या रात्री..
पण तुझ्या रूपाने असतोच ना तो समोर.."
सखी काय म्हणणार..
कौतुकाने पाहत राहते..
त्याला.. अन् तारयांना...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा