मंगळवार, १२ मे, २०१५

पाऊस, तू आणि मी,
असं त्रिकुट जमावं...
आपण गप्पा माराव्यात
अन दुनियेनं चिंब व्हावं...

#मनस्वी #VinayakVBelose

गुरुवार, ७ मे, २०१५

ख्वाब तो कई देखते हैं लोग,
ख्वाब देखना आसान होता हैं।
जब ठोकरे मिलती हैं राहोंपर
तो सच्चाई का एहसास होता हैं।।

जितना ख्वाब बड़ा हो,
रास्ते उतनेही लंबे होंगे।
अगर कर पाए सफ़र पूरा
तो किसी कागज़ के टुकड़े पे हम दिखेंगे।।

अगर नहीं हो पाया कुछ
तो उसी राहपर हम होंगे।
मकाम तो हमारा न होगा,
हम मील का पत्थर जरूर बनेंगे।।

#मनस्वी #Vinayakvbelose

मी दारात जाऊन अडतो..
आताशा आत मी जात नाही..
अपुरी राहील इच्छा, या भीतीने
नवसच मागत नाही...

#मनस्वी #VinayakVBelose

सांग ना सखे, चाहूल माझी
अजूनही तुला भावते का?
मी नसताना मनात तुझ्या,
अजुनही.. चलबिचल होते का?

सांग ना खरेच आताशा,
तुला बोलावेसे वाटते का?
पावसाचा थेंब झेलताना
तुला आठवण माझी येते का?

#मनस्वी #VinayakVBelose

मंगळवार, ५ मे, २०१५

तू तिथे पावसात भिजताना
सखे.. मी इथे घामात न्हाहतो...
असो... त्यातही मी
चिंब होण्याचे साम्य शोधतो...

#मनस्वी #VinayakVBelose

मुकाम पे पहुँचना तो बस सफ़र का एक हिस्सा था।
मैं खुद को पाकर आया हूँ, यहीं तो करने निकला था।।

- #मनस्वी #VinayakVBelose

मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

कारण असावं असं नाही...
कित्येकदा वाटतं कोणीतरी
असायला हवं होतं सोबत...
अगदी या क्षणापुरतं का होईना...
असं वाटायला लागतं
आणि त्याचवेळी डोळ्यासमोरुन
एक माणसांची रांग पुढे सरकते.
ती जशी पुढे जाऊ लागते,
आपण त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करु लागतो..
सोबत राहण्यासाठी..
दरवेळी कोणीतरी येतं समोर
आणि आपण त्या व्यक्तीच्या विचारात बुडून जातो...
परंतु, कधीतरी एखादी वेळ अशीही येते,
आपण शोधत राहतो ती एक व्यक्ती...
आणि ती सापडतच नाही...
अश्या वेळी आपण
स्वतःच्या आत डोकावून पाहू लागतो..
आणि तेव्हा जाणवतं...
थोडं स्वतःशीच बोलायला हवं कधीतरी..
या क्षणी आपला शोध खऱ्या अर्थाने संपलेला असतो...

#मनस्वी #VinayakVBelose

ना तूने जिक्र किया, ना मैंने बात की..
नजर से नजर मिली, और बात बन गयी।

#मनस्वी

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

नसीब ले के तो आते हैं कई लोग,
पर हम आदतों से मजबूर हैं।
एक आदत ऐसी भी हैं की,
अपना नसीब हम खुद लिखते हैं।।

#मनस्वी

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

कभी तू किसीका अपना था, आज फिर पराया हैं।
तेरे इश्कने जिताया था तुझे, तेरे गुरुर ने हराया हैं।

#मनस्वी

बुधवार, १ एप्रिल, २०१५

तुझे इश्क था मुझसे पर क्या करु,
अपने बंजारेपनसे मैंने भी उतनीही मोहब्बत की हैं|

#मनस्वी

मंगळवार, ३१ मार्च, २०१५

इस जहाँ में अब बचा ही कौन हैं तेरा,
चल फकीरा, कोई और जहाँ ढूंढते हैं।

#मनस्वी

तुझ्या माझ्या गप्पांमध्ये
मीच बोलत असतो..
तू ऐकत राहतेस संदीप, सलिल..
मी तुलाच पाहत असतो..

#मनस्वी

बुधवार, २५ मार्च, २०१५

मना..

सांगशील का माझ्या मना
तू सैरभैर का व्हावे ऎसे?
सोड ना आता कश्याला
विचार (त्यांचा), ज्यांना जायचे...

का करीशी हट्ट असा तू,
का तुला थांबायचे..
चल पुढे जाऊयात आता..
इथे आपुले न काहीच व्हायचे..

तुझ्याच म्हणण्याप्रमाणे मी
वागलो होतोच ना..
मग आता वेळ तुझी बघ
मी सांगेल ते ऐकायचे...

#मनस्वी
#VinayakVBelose

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३

तुझ्या केसातून डोकावणारी
सांजेची सोनेरी किरणे....
अधुन मधून तुझे
केसांतून हात फिरवणे...

समोर वाहणारी निवांत
चकाकणारी नदी...
तिच्या प्रवाहातूनही
तुझ्याच प्रतिबिंबाची गर्दी...

रोज सूर्य मावळताना
मी अशीच स्वप्ने पाहतो...
खरी होतील न होतील
हे तुझ्यावर मी सोडतो...

- मनस्वी...